पिकांतील रासायनिक अंश तपासणी प्रयोगशाळा उभारू;  कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांची माहिती 

Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam
Updated on

पलूस (सांगली) : सांगली व परिसरातील जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात युरोपीयन देश व इतर देशात निर्यात होते. त्यातील कीडनाशके, ऊर्वरित अंश तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणार आहे. 17 कोटी खर्च अपेक्षित आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कृषी विभागाचे सचिव व अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत. 

मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची प्रश्नांसंदर्भात डॉ. कदम यांनी बैठक घेतली. त्यांनी प्रयोगशाळे संदर्भात निर्देश दिले. कृषी सचिव एकनाथ डवले, तालुका कृषी संचालक दिलीप झेंडे, संचालक (विस्तार) श्री. मोटे, सांगली जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, द्राक्षबागायतदार प्रतिनिधी मारूती चव्हाण, संदीप सिसाळ, सचिन जाधव, संजय माळी, केशव चव्हाण, प्रकाश पाटील उपस्थित होते. 

जिल्ह्यात 32 हजार हेक्‍टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. पाच लाख लोकांना रोजगार मिळातोय. जिल्ह्यातून गेल्यावर्षी युरोपियन देशात 8 हजार 484 टन, तर इतर देशांत 9 हजार 770 टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. बेदाणा मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. डाळिंब, इतर फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. 

शेतमाल निर्यातीत विशेषतः जिल्ह्यातून द्राक्षाची दर वर्षी वाढ होत आहे. त्यामुळे कीडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा गरजेची बनली आहे. सध्या ही सुविधा पुणे येथे असल्याने सांगली व परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. सांगलीत ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. दर्जेदार व गुणवत्तापुर्ण पिकांचे उत्पादन घेण्यास मदत होईल. तपासणी अहवाल वेळेत मिळून निर्यात लवकर होणार आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com