esakal | अबब...! सोलापूर ग्रामीणमध्ये पुन्हा सात बळी; 'या' गावांमध्ये सापडले 148 पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

2Corona_20Sakal_20times_4.jpg

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांतील 23 हजार 996 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले तीन हजार 120 कोरोना पॉझिटिव्ह 
  • कोरोनाबाधितांपैकी 89 रुग्णांचा झाला मृत्यू; एक हजार 744 रुग्णांची कोरोनावर मात 
  • बार्शीत 30, अक्‍कलकोट तालुक्‍यात 15, दक्षिण सोलापुरातील दहा रुग्णांचा मृत्यू 

अबब...! सोलापूर ग्रामीणमध्ये पुन्हा सात बळी; 'या' गावांमध्ये सापडले 148 पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडाही दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी (ता. 28) जिल्ह्यात 148 रुग्णांची भर पडली असून त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बार्शी, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर हे तालुके आघाडीवर आहेत.

अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, दुधनी, मैंदर्गी, स्वामी समर्थ नगर, तडवळ येथे प्रत्येकी एक, म्हाडा कॉलनीत दोन, बुधवार पेठेत चार, करमाळ्यातील फंड गल्लीत एक, शेलगाव (क) मध्ये पाच, माढा तालुक्‍यातील रिधोरेत 17, उपळाई खु.मध्ये एक रुग्ण आढळला आहे. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, लवंग, मांडवे, नातेपुते, वाफेगाव, यशवंत नगर येथे प्रत्येकी एक, मोहोळमधील रोहिदास नगरात तीन, साठे नगरात दोन, कामती बु. येथे सात, पापरीत दोन रुग्णांची भर पडली आहे. उत्तर सोलापुरातील डोणगावात एक, हिरजेत चार, वडाळ्यात 19, पंढरपुरातील अनिल नगर, बडवे गल्ली, चंद्रभागा घाट, गांधी रोड, इंदिरा गांधी मार्केट, जुना सोलापूर नाका, कदबे गल्ली, खवा बाजार, रामबाग रोड, सावता माळी मठ, भांटुबरे, फुलचिंचोली, नेपतगाव, तुंगत येथे प्रत्येकी एक, सिध्दीविनायक सोसायटीत तीन, बोहाळीत सहा, नारायण चिंचोलीत दोन रुग्ण आढळले. तर सांगोल्यातील बलवडी, निजामपूर, शिरभावी येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, वझरे येथे पाच रुग्ण सापडले. दक्षिण सोलापुरातील धोत्रीत सहा, कासेगावात चार आणि बार्शीतील अलिपूर रोड परिसरात सहा, भवानी पेठ, ढगे मळा येथे प्रत्येकी दोन, भिम नगर, कासारवाडी रोड, सासुरे, सिध्देश्‍वर नगरात प्रत्येकी एक, तर हळदुगे येथे सहा रुग्ण आज सापडले आहेत. 

'येथील' सात जणांचा झाला मृत्यू 
पंढरपूर तालुक्‍यातील फुलचिंचोली येथील 40 वर्षीय महिला, बालाजी नगरातील 50 वर्षीय पुरुषाचा, करमाळ्यातील शेलगाव (क) येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापुरातील वळसंग येथील 65 वर्षीय महिला, मंद्रूप येथील 75 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील सासुरे येथील 71 वर्षीय पुरुष, सनगर गल्लीतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांतील 23 हजार 996 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले तीन हजार 120 कोरोना पॉझिटिव्ह 
  • कोरोनाबाधितांपैकी 89 रुग्णांचा झाला मृत्यू; एक हजार 744 रुग्णांची कोरोनावर मात 
  • बार्शीत 30, अक्‍कलकोट तालुक्‍यात 15, दक्षिण सोलापुरातील दहा रुग्णांचा मृत्यू 
loading image