आटपाडी तालुक्‍यातील सात हजार गलाई बांधव येथे अडकले...

corona new logo.jpg
corona new logo.jpg
Updated on

आटपाडी (सांगली)- माणदेशाच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ. जगण्याची भ्रांत. त्यावर माणदेशी माणसाने गलाई व्यवसायातील कौशल्य आत्मसात करून मात केली. या व्यवसायानिमित्ताने संबंध भारतभर तालुक्‍यातील पाच ते सात हजार गलाई बांधव पसरलेत. कोरोनाच्या संचारबंदीत ते अडकलेत. त्यांनाही गाव पांढरीची ओढ लागली असून विविध माध्यमांतून गावाकडे येण्यासाठी शासनाकडे साद घातली आहे. 


माणदेश अवर्षण प्रवण प्रदेश. पिढ्यान पिढ्या पाचवीला पूजलेला दुष्काळ. दोन वेळच्या जेवणासाठी भलामोठा संघर्ष करावा लागत होता. पण माणदेशी माणूस त्या संघर्षांपुढे हातबल झाला नाही. प्रचंड चिकाटी असलेला माणदेशी माणसाने जगण्याची साधने शोधली. यातीलच एक कच्चे सोने पक्के करून देणे. गेल्या पन्नास वर्षांपासून माणदेशी माणूस या व्यवसायात गुंतला आहे. गलाई व्यवसाय निमित्ताने तो कश्‍मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बांगलादेशापासून गुजरात पर्यंत, ते तेलंगणा, दिल्ली, तमिळनाडू राज्यासह श्रीलंके पर्यंत पोहोचला आहे. यात चांगलेच बस्तान बसवले आहे.

सध्या कोरोनामुळे संचारबंदी देशभर आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग थांबेना. उलट देशात मोठ्या शहरात वाढतोच आहे. माणदेशातील गलाई व्यावसायिक मोठ्या शहरातच आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढत चालली आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासह बाहेर अडकलेत तर अनेक जण गावाकडे आणि कुटुंब शहरात तर काहींचे कुटुंब गावात आणि ते शहरात असे चित्र आहे. लॉक डाऊन आणि कोरना साथ याबाबत काहीच अंदाज लागत नसल्यामुळे अस्वस्थ असलेल्या गलाई व्यावसायिकांना गावची ओढ लागली आहे. गावाकडे येण्यासाठी शासन पातळीवर मागणी केली आहे. त्यांची तपासणी करून सोडावे आणि तपासणी करूनच तालुक्‍यात प्रवेश घ्यावा. वेळप्रसंगी होमक्वारंटाईन केले तरी चालेल पण आम्हाला येऊ द्या, अशी साद घातली आहे. 


यासाठी गलाई व्यावसायिक संभाजीराव पाटील आणि राजाराम देशमुख यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला. सेनेचे आमदार अनिल बाबर यांनी गलाई बांधवांना त्यांची नावे, सध्या पत्ता, आधार कार्ड आणि फोन नंबर पाठवण्याचे आव्हान केले आहे. तसेच माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे गलाई बांधवांना गावाकडे आणण्याचे साकडे घातले आहे. श्रमिक मुक्ती दलाचे आनंदराव पाटील, करगणीचे उमेश पाटीलसह अनेकांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सचिव पातळीवरील अधिकार यांच्यापर्यंत ती पोहोचली आहे. त्यांना गावाकडे आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्नांनी वेग घेतला आहे. 


गलाई बांधव देशभर विखुरला आहे. आम्हाला गावाला जायचं आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष परवानगी द्यावी. आम्ही स्वखर्चाने येण्यास तयार आहोत.- संभाजीराव पाटील ( गलाई व्यवसायिक)  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com