सांगलीत साप चावल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू

विजय पाटील
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

सांगली - येथे साप चावल्याने ७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. केदार चव्हाण असे बालकाचे नाव आहे.  विश्रामबाग येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील घरकुलात पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

संतप्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकत संताप व्यक्त केला. वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीचा निधी अन्यत्र वळवल्याचा त्यांचा प्रशासनावर आरोप होता. 

याबाबतची अधिक माहिती अशी किरण चव्हाण हे महावितरणमध्ये तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. सर्पदंश झाल्यानंतर पहाटे जागा झालेल्या केदारने आई वडिलांना साप चावल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ त्याला सिव्हिल रुग्णालयात हलवले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान सकाळी हा प्रकार समजल्यानंतर वसाहतीतील रहिवाशांचा संताप अनावर झाला. कारण वसाहतीच्या परिसरात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छता करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचे पडसाद आज उमटले. महिलांनी सिव्हिल विभागाला टाळे लावले. अधिकाऱ्यांना घेराव घातला. मोर्चा काढून निषेध नोंदवला. मुलाचे पार्थिव अंत्यसंस्कारापासून रोखून ठेवण्यात आले. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: Seven-year-old child dies due to snake bite