रेडेघाटी परिसरात रस्त्यावर कोसळला शाडूचा भराव; पावनगड कडे जाणारा मार्ग बंद

पन्हाळा व परिसरात होणाऱ्या सततच्या जोरदार पावसामुळे रेडेघाटी परिसरात शाडूचा भराव रस्त्यावर कोसळल्याने पन्हाळ्याहून पावनगडला जाणारा रस्ता बंद झाला आहे.
Shadu Soil landslide
Shadu Soil landslidesakal
Updated on
Summary

पन्हाळा व परिसरात होणाऱ्या सततच्या जोरदार पावसामुळे रेडेघाटी परिसरात शाडूचा भराव रस्त्यावर कोसळल्याने पन्हाळ्याहून पावनगडला जाणारा रस्ता बंद झाला आहे.

आपटी - पन्हाळा व परिसरात होणाऱ्या सततच्या जोरदार पावसामुळे रेडेघाटी परिसरात शाडूचा भराव रस्त्यावर कोसळल्याने पन्हाळ्याहून पावनगडला जाणारा रस्ता बंद झाला आहे. आज दुपारी दोन अडीचच्या दरम्यान हा शाडूचा भराव कोसळला.ही घटना सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या सुशांत पन्हाळकर यांनी संपर्क करून सदर माहिती दिली.

पावनगडवर येथील नागरिकांना पन्हाळा कोल्हापूर या ठिकाणी जाणे येणेसाठी हाच एकमेव रस्ता आहे. तर गेल्या वर्षी भूस्खलन होऊन पन्हाळ्याचा मुख्यरस्ता खचल्यानंतर याचा मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर केला होता. हा परिसर वनविभागाच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करता येत नाही. पावनगडचे नागरिक चिखला मधून कसरत करत याच कच्च्या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे पन्हाळ्यावरून पावनगड ला जाण्यासाठी लोकांना जीवाची बाजी लावून पावनगडला जाणाऱ्या मुख्यमार्गावर भराव कोसळल्यामुळे गडावरील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर हा भराव काढावा मार्ग खुला करून द्यावा असे पावनगड वरिल रहिवासी अंजुम मुजावर यांनी सांगितले. तर सायंकाळी नगरपरिषदेने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने भराव हटविण्यास सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com