

नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने विश्वस्तपदी नेमणूक केलेल्या ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांनी विश्वस्तपदी निवड कायम झाली. 2015 मध्ये जिल्हा न्यायालयात या निवडी घोषित करण्यात आल्या होत्या. त्या विरोधात दर्गादायरा येथील आर्किटेक अर्शद शेख व इसाक जहागीदार यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
1970 पासून अस्तित्त्वात असलेल्या तत्कालीन विश्वस्त मंडळावर दर्गा दायरा ट्रस्टच्या मालमत्तेत गैरकारभार केल्याचे आरोप झाले. त्यामुळे ते विश्वस्त मंडळ बरखास्त करुन न्यायालयाने नवीन विश्वस्त नेमणुकीसाठी रिसतर प्रक्रीया राबविली. त्यात 2015 साली ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांच्यासह मोहम्मद शेख, निजाम शेख, अकबर शेख, समीर सय्यद, नौशाद शेख, अतामियॉं शेख यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर विश्वस्तांमधूनच ट्रस्टच्या अध्यक्षपदी मोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली होती.
दरम्यान, जहागीरदार यांच्या निवडीला अर्शद शेख व इसाक जहागीरदार यांनी आक्षेप घेत आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकाल कायम ठेवून ही हस्तक्षेप याचिका निकाली काढली. ट्रस्टतर्फे ऍड. सी. एस. देशमुख यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. विश्वस्तपदी जहागीरदार यांची निवड कायम झाल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद शेख यांच्यासह नगरसेवक नजीर शेख, रशिद जहागीरदार, शौकत जहागीरदार, साबीर सय्यद, इम्रान जहागीरदार, ऍड. दावर शेख आदींनी स्वागत केले. तसेच पेढे भरुन व येथील नौबत वाद्ये वाजवून निवडीबद्दल जल्लोष केला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.