Shahaji Patil : मतविभाजनामुळेच सांगोल्यात पराभव : शहाजी पाटील
Sangola Assembly Election Results : तालुक्यातील ९१ हजार मतदारांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याने जबाबदारी वाढली आहे. चिकमहूद येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक
महूद : शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगोला विधानसभेची निवडणूक हातात घेऊन माझा पराभव करण्याचा पणच केला होता. त्यांच्या जाळ्यात आपला सहकारी दीपक साळुंखे-पाटील अडकले. त्यामुळे मत विभाजन होऊन आपला पराभव झाला.