सन १९८९ पर्यंत जमिनीचा व्यवहार हा खरेदी देणारा आणि खरेदी घेणारा जो सांगेल, तो ग्राह्य माणून त्यावर मुद्रांक शुल्क आकारला जात असे. त्यात फसवणूक होत आहे.
सांगली : समृद्धी महामार्गाला (Samruddhi Highway) रेडीरेकनरच्या पाचपट आणि नंतर चारपट दर दिला गेला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Ratnagiri-Nagpur National Highway) नागपूर ते अंकलीपर्यंत चारपट दराने जमीन अधिग्रहण झाले, मात्र आता शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) आणि रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या उर्वरित टप्प्यासाठी रेडीरेकनरच्या फक्त दुप्पट दर दिला जाणार असल्याने वाद उद्भवला आहे. या सर्व चर्चेत ‘रेडीरेकनर’ अर्थात ‘किमान सरकारी भाव’ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो ठरतो कसा, हे पाहणे रंजक आहे.