esakal | शरद पवारांकडून बारामतीत महापौरांचा वर्ग... काय दिला सल्ला?

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar taken mayor's class in Baramati ... What advice did he give?}

सांगली शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज दिला.

शरद पवारांकडून बारामतीत महापौरांचा वर्ग... काय दिला सल्ला?
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज दिला. महापालिकेतील घडामोडींची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी इथले राजकारण जाणून घेतले. महापौरांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे श्री. पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे राहुल पवार, अल्पसंख्याक सेलचे आयुब बारगीर उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार यांनी सार्वजनिक भेटीगाठीवर निर्बंध आणले आहेत. सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी रद्द केले असून सध्या ते गोविंदबागमध्ये थांबून आहेत. सांगली महापालिकेतील विजयानंतर श्री. सूर्यवंशी यांनी पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज सकाळी बारामती गाठली होती. यावेळी श्री. पवार यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चा केली.

शहराच्या विविध विकासकामांबद्दल माहिती जाणून घेतली. तुमचे नियोजन काय अशी विचारणा केली. शेवटी झटून काम करा असा सल्ला दिला. 
सांगली महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीने थेट महापौरपदावर उडी घेत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. 39 विरुद्ध 36 मतांनीच या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेश पाटील यांनी भाजपचे उमेदवार गजानन मगदूम यांचा पराभव केला आहे. या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली. 

श्री. बजाज यांना श्री. पवार यांनी किती सदस्य अनुपस्थित राहिले आणि किती सदस्यांनी विरोधी मतदान केले हे जाणून घेतानाच फुटीर सदस्य यापुढे आपल्यासोबत राहणार का असा सवाल केला. त्यावर श्री. बजाज यांनी फुटीर सदस्य पूर्वी आपल्याकडेच होते. ते फुटून तिकडे गेले असा खुलासा केला. श्री. पवार यांनी फुटलेल्या सदस्यांना ताकद द्या. त्यांची कामे करा असा सल्लाही दिला. 

सांगलीचा भडंग आणि पेढे 
महापौरांनी श्री पवार यांना भेट म्हणून सांगलीचा भडंग आणि विजयाबद्दल पेढे दिले. श्री. पवार यांनी त्याचा महापौर व पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थापच मारली. ते म्हणाले,""विरोधकांनी आपल्या कार्यकर्त्यांना धाक दाखवून फोडले. तुम्ही त्यांना चांगले प्रत्युत्तर दिले. पण आता जनतेची कामे करा. निधीसाठी जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करा.'' 

संपादन : युवराज यादव