
आटपाडी (सांगली)- ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी (ता.13) रोजी तालुक्यातील खानजोडवाडी येथे येणार आहेत. या दौऱ्यात ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशस्वीपणे डाळिंब उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधून ते समस्या जाणून घेणार आहेत.
खानजोडवाडी युरोपमध्ये डाळिंबाची मोठी निर्यात होते. किटनाशकांचा अंशापासून मुक्त अशी दर्जेदार डाळिंब लागवडीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. गावातील प्रकाश सूर्यवंशी यांची 25 एकर बाग आहे. त्यांनी बुलढाणा येथेही अशीच बाग पिकवली आहे. ती बाग बुलढाणा अर्बन बॅंकेचे संचालक व्यक्तीची आहे. तेथे हंगाम काळात मुक्कामाला असताना श्री पवार ती बाग पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी श्री. पवार यांना आटपाडीतील बागा पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. ते त्यांनी मान्य केले होते.
यंदा अतिवृष्टीने डाळिंबांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतेक बागा वाया गेल्या आहेत. श्री सूर्यवंशी यांनी या संकटकाळात आपली बाग तगवली आहे. हे त्यांनी कसे साध्य केले याबद्दलच्या कुतहलापोटी पवार यांनी हा दौरा निश्चित केला आहे. या दौऱ्यात ते खामकरवाडीतील बागांही पाहणार आहेत. नुकतीच प्रकाश सूर्यवंशी, सरपंच रामदास सूर्यवंशी, प्रतापराव काटे, रमेश सूर्यवंशी आणि अनिल सूर्यवंशी यांनी डाळिंब बागायतदारांच्या व्यथा पवार यांना बारामती येथे भेटून सांगितल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लवकरच येऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज श्री पवार यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रकाश सूर्यवंशी यांना शुक्रवारी दौरा निश्चित केल्याचा निरोप मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.