Maharashtra Ekikaran Samiti : डॉ. लिंबाळेंनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा थेट इशारा, सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप

Sharan Kumar Limbale controversy latest news : शरणकुमार लिंबाळेंनी सीमाभागातील मराठी जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने माफीची मागणी केली आहे. अन्यथा पुण्यात साहित्य संमेलनावेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Karnataka border issue

Maharashtra Karnataka border issue

esakal

Updated on: 

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी सीमाभागातील मराठी जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील मराठी भाषकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली (Maharashtra Ekikaran Samiti demands apology) आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी माफी न मागितल्यास पुणे येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे. मराठी भाषकांच्या अस्मितेचा आणि सीमाप्रश्‍नाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा निर्धारही समितीने व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...