वांगी येथे पहिल्या महिला उपसरपंच होण्याचा मान यांना मिळाला...

रवींद्र मोहिते
Thursday, 27 August 2020

वांगी (सांगली)-  येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. विद्या प्रशांत पाटणकर यांची आज निवड झाली. त्यांना 10 तर कॉंग्रेसच्याच मनिषा राजेंद्र पाटील यांना नऊ मते मिळाली. पहिल्या महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. 

वांगी (सांगली)-  येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. विद्या प्रशांत पाटणकर यांची आज निवड झाली. त्यांना 10 तर कॉंग्रेसच्याच मनिषा राजेंद्र पाटील यांना नऊ मते मिळाली. पहिल्या महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. 

कडेगांव तालुक्‍यातील सर्वात मोट्या ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. अडीच वर्षापूर्वी पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 15 सदस्य कॉंग्रेसचे व सरपंचपदी डॉ. विजय होनमाने विजयी झाले. इतर सदस्यांना आलटून-पालटून उपसरपंचपद देण्याचे वरिष्ठ नेत्यांसमोर ठरले. इच्छूक प्रत्येकाला पद प्रथम हवे असल्याने सुरवातीच्या निवडीपासून गटबाजी सुरू झाली. त्यातूनच एकमेकावर कुरघोड्या करीत राहुल साळुंखे, बाबासो सुर्यवंशी आणि यशवंत कांबळे उपसरपंच झाले. सहा महिन्यात कांबळे यांनी राजीनामा दिला. 

काल सरपंच डॉ. होनमाने यांच्या अध्यक्षतेखाली नूतन उपसरपंचांची निवड झाली. कॉंग्रेसच्याच सौ. मनीषा राजेंद्र पाटील आणि विद्या प्रशांत पाटणकर यांनी उमेदवारी दाखल केली. सरपंचासह उपस्थित सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दोघींनाही समान 9, 9 मते मिळाली. आणखी एक निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचाना असल्याने त्यांनी तो पाटणकर यांच्या पारड्यात टाकला. त्या विजयी झाल्या. 
निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी झाली. माजी सभापती भगवान वाघमोडे, माजी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, सोनहिराचे माजी संचालक महादेव दाईंगडे, शिवप्रतिष्ठानचे मिलींद साळुंखे, गोरख कांबळे, माजी उपसरपंच प्रकाश सुर्यवंशी, राहुल साळुंखे, यशवंत कांबळे, दिपकभैय्या सुर्यवंशी, अरुण पाटणकर, मारुती मोकळे, संतोष मोकळे, सुर्योदय सुर्यवंशी, दत्तात्रय चव्हाण यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She was honored to be the first woman Deputy sarpanch at Wangi