अतिक्रमण म्हणून घरे पाडली, नंतर कळलं गड्या चूक झाली

In ShetfhaleThe houses were demolished due to encroachment, then it was found out it was wrong action
In ShetfhaleThe houses were demolished due to encroachment, then it was found out it was wrong action
Updated on

आटपाडी (जि . सांगली ) ः दिघंची ते हेरवाड या राज्य मार्गाच्या कामासाठी पाच घरे पाडण्यात आली. पहिला सांगितलं गेलं की अतिक्रमणातील घरे आहेत, त्या पाच घरमालकांनी तक्रार दाखल केली. त्याची मोजणी झाली आणि आता कळालं आहे की ही घरं अतिक्रमणात नव्हतीच. त्यामुळे घर मालकांना भरपाई मिळणार की पुन्हा होती तशी घरे बांधून देणार आणि ती देणार कोण, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागासह महसूल विभागाच्या अतिशय भोंगळ कारभाराचा पंचनामा यानिमित्ताने झाला आहे. 

दिघंची ते हेरवाड राजमार्ग 153 शेटफळेतून जातो. काम करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली विविध कच्ची-पक्की बांधकामे, शौचालय, कुंपन आदी पाडली. यावर आक्षेप घेत चार जण न्यायालयात गेले. पाच जणांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. याशिवाय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या दरबारात तक्रार दाखल केली गेली. जिल्हा परिषद सभेत चर्चेची झोड उठली. वातावरण चिघळत चालल्यामुळे रस्त्याचे काम थांबले. 

सोमवारी पोलीस बंदोबस्तात भूमी अभिलेख कार्यालयाने गूगल ऍपवरून मोजणी केली गेली. दोन दिवसात नकाशा तयार करून आज तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या उपस्थितीत आणि पोलिस बंदोबस्तात तक्रारदारयांची घरे आणि जागेच्या हद्दीत निश्‍चित केल्या.

यावेळी भुमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक आणि तलाठी ही उपस्थित होते. हद्द निश्‍चितीमुळे तक्रारदारांची बांधकामे त्यांच्या अधिकृत जागेतच होती, हे स्पष्ट झाले. यामध्ये दोघांची बांधकामे पाडलेली नाही तर अन्य तिघांची बांधकामे पाडली आहेत. 

याशिवाय इतर पंचवीस ते तीस बांधकामे पाडली आहे. तीही लोकांच्या अधिकृत जागेतच होती, अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. बांधकामे कशाच्या आधारे पाडली, कोणी पाडली, त्यांच्यावर कारवाई होणार का आणि अतिक्रमण केलेल्या लोकांवरती कारवाई होणार का या प्रश्नांसह थांबलेल्या रस्त्याचे काम सुरू होणार का, याकडे गावाचे लक्ष लागले आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com