Crime News : घागरेवाडीत शेतकऱ्याचा ; विजेच्या धक्क्याने मृत्यू; शेतात मोटार सुरू करतेवेळी घटना

Farmer Dies : शेतात रोजच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यात घडली आहे. मोटार सुरू करताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने विजेचा जबरदस्त धक्का बसून या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
electric shock while operating a water motor.

electric shock while operating a water motor.

sakal

Updated on

शिराळा : घागरेवाडी (ता. शिराळा) येथे धुमाळ मळा येथील शेतकरी आनंदा बंडू सावंत (वय ६७) यांचा पाण्यातील विद्युत मोटार सुरू करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजित मारुती लोहार (वय ४२) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com