
शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील पेट्रोलपंपासमोर राहणारे ज्ञानदेव राजाराम पाटील (वय ७१) यांच्या पत्नीस सोन्याच्या दागिन्यास पॉलिश करून देतो, असे सांगून साडेचार तोळ्याचे दागिने घेऊन दोघे चोरटे पसार झाले. पोलिस ठाण्यात दोन अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली.