
शिराळा : महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय निकाल घोषित झाला. यामध्ये पुणे विभागातून शिराळा पंचायत समितीचा दुसरा क्रमांक आला. महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समितींच्या कामकाजाचे मूल्यमापन होते. आर्थिक वर्षातील आरोग्य, शिक्षण, कृषी, मनरेगा, घरकुल, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण अशा सर्व विभागांच्या कामकाजाचे मूल्यमापन या अभियानांतर्गत केले जाते.