
बिळाशी : काही दिवसांपासून शिराळा तालुक्याच्या पश्चिमोत्तर भागामध्ये थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याने सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवत आहे. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक, पोषक ठरत आहे. वातावरणात थंडीचे प्रमाणात अधिक जाणवत असल्यामुळे नागरिकांकडून उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.