शिराळा तालुक्‍यात मोबाईल घरात अन्‌ रेंज दारात 

शिवाजीराव चौगुले 
Wednesday, 30 September 2020

शिराळा : तालुक्‍यातील डोंगरी भागातील विद्यार्थी घरात मोबाईलची रेंज नसल्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन ऑनलाईन शिक्षण घेवू लागले आहेत.

शिराळा : तालुक्‍यातील डोंगरी भागातील विद्यार्थी घरात मोबाईलची रेंज नसल्याने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन ऑनलाईन शिक्षण घेवू लागले आहेत. खास करून शिराळा पश्‍चिम भागात मोबाईल रेंजची समस्या आहे. यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड सुरू असून मोबाईल घरात अन्‌ रेंज दारात अशी अवस्था झाली आहे. 

शिराळा तालुक्‍यात प्राथमिक, खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांनी जूनपासूनच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. पहिलीपासून दहावीपर्यंतच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, साधनव्यक्ती मधुकर डवरी, पांडुरंग गायकवाड व सर्व केंद्रप्रमुख यांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. सर्व शाळांतील शिक्षक मोठी धडपड करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
शिराळा तालुका डोंगरी असल्याने अनेक भागात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी हे विद्यार्थी उंचावरील ठिकाणे, डोंगर, शेते आदी ठिकाणी जाऊन मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत . .काही गावात रेंज मिळेल आशा ठिकाणी गटागटाने विध्यार्थी शिक्षण घेताना दिसत आहेत . 

गरजांना मुरड... 
आपली मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून अनेक सामान्य पालकांनी आपल्या इतर गरजांना मुरड घालून मुलांच्या साठी स्मार्टफोन घेतले आहेत. मोबाईल मिळाला पण आता रेंज नसल्याची स्थिती आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shirala taluka mobile house and range door