कट्यावर बसल्यानं काय होतंय.... गांभीर्य कधी कळणार?

In Shirala-West region Corona needs to be taken seriously
In Shirala-West region Corona needs to be taken seriously

बिळाशी (जि. सांगली)  : "कोरोना' विषाणूच्या वाढत्या संसर्गाने वाढती लोकसंख्या असणाऱ्या मुंबई, पुणे आदी शहरी भागातच थैमान घातले आहे असे नाही "कोरोना' चा शिरकाव आता शिराळा-पश्‍चिमधील ग्रामीण भागातील निगडी, अंत्री खुर्द, रेड, मोहरे, खिरवडे, करंगली, चिंचोली आदी गावांमध्येही झाल्याने "कोरोना' चे रुग्ण सापडले आहेत. केंद्र, राज्य, शासनाच्या सुयोग्य नियोजनाने बहुतांश रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणाही चांगल्या प्रकारे झाली आहे. तालुक्‍यातील पहिला "मोहरे' गावातील एक रुग्ण मात्र "कोरोना' ने दगावला आहे. 

तालुक्‍यात रुग्णसंख्येत वाढ होत असताना विशेषतः तरुणाई मात्र कुठे आहे कोरोना, गावच्या पारांवर, कट्टयावर बसल्याने काय होतंय अशा आविर्भावात गल्लीत, चौकात, तालमीच्या कट्यावर गप्पांचे फड रंगवत असताना तसेच पत्त्यांची फिसणी करताना पहावयास मिळत आहेत, परंतु अशा गप्पांच्या फडांच्या माध्यमातून ही "कोरोना' चा संसर्ग वाढू शकतो हे कोण त्यांना सांगणार ? 

केंद्र, राज्य सरकारने रेड झोन, कंटेन्मेंट झोन वगळता बहुतांश भागात काहीअंशी का होईना शिथिलता जाहीर केल्याने सर्वत्र जणू "कोरोना' संसर्गच टळला आहे असे समजत ग्रामस्थ, शारीरिक अंतराचे पालन न करता, गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी "मास्क' चा वापरच करत नाहीत. 

काळजी घेण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी

तोंडाला "मास्क' लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, खोकताना, शिंकताना तोंडासमोर रूमाल धरणे, शरीर अंतर ठेवणे हे नियम नाहीत ती काळाची गरज आहे. दंड, कारवाई करून ते पाळावेत ही शोकांतिका आहे. संसर्ग टाळायचा असेल तर प्रत्येकाचीच जबाबदारी काळजी घेण्याची आहे. 

- वसंत रामचंद्र खवरे, "कोरोना विषाणू' जनजागृती समर्थक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com