शिर्डी बंद' तात्पुरता स्थगित 

shirdi strike stoped
shirdi strike stoped

 नगर :शिर्डीसह परिसरातील ग्रामस्थांची आज सायंकाळी उशिरा ग्रामसभा झाली. ग्रामस्थांनी पुकारलेल्या "बेमुदत बंद'वर सभेत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील शिष्टमंडळाला उद्या (सोमवारी) चर्चेसाठी मुंबईला बोलाविले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुकारलेले "बेमुदत बंद' आंदोलन साईभक्तांचा विचार करून तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा न झाल्यास, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय या वेळी ग्रामस्थांनी घेतला. 

मुख्यमंत्री तोडगा काढतील : भुजबळ 
""कुठल्याही वादामुळे येथील साईबाबांचे महत्त्व कमी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (सोमवारी) या वादातून तोडगा काढतील,'' असा विश्वास अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 
मंत्री भुजबळ यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या वादाबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. 


त्याबाबत विचारले असता, मंत्री भुजबळ म्हणाले, ""या वादात कोणीही राजकारण करू नये, असे मला वाटते. मुख्यमंत्री दोन्ही बाजू ऐकून योग्य तो तोडगा काढतील. साईचरित्र ग्रंथ महत्त्वाचा आहे. बाबांची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे. येथील विमानतळावरही सतत गर्दी असते, यातच सर्व काही आले.'' दरम्यान, समता परिषदेतर्फे उद्योजक किशोर बोरावके यांनी मंत्री भुजबळ यांचे स्वागत केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com