शिर्डीकर बंदवर ठाम, पाथरीसह आठ ठिकाणचे दावे फेटाळले 

shirdiar stand firm on the strike
shirdiar stand firm on the strike

शिर्डी: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पाथरी ही साईजन्मभूमी आहे, हे वादग्रस्त विधान जोपर्यंत मागे घेत नाहीत. तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवत नाहीत, तोपर्यत शिर्डी व परिसरातील गावे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आज (शनिवारी) रात्री उशिरा झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. साईबाबांच्या सेवेकऱ्यांपैकी एक असलेल्या लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शहर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित होते. 

दावा कायमस्वरूपी फेटाळून लावा 
पाथरीला निधी देण्यास विरोध नाही. मात्र, हे गाव साईजन्मभूमी नाही, असे जाहीर करावे. इतर आठ ठिकाणी साईजन्मभूमी असल्याचा दावा केला जातो. हे दावे कायमस्वरूपी फेटाळले जावेत. बंदच्या काळात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असे ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आज रात्री मध्यरात्रीपासून बेमुदत बंदला सुरवात होत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच एका पाठोपाठ एक दुकाने बंद होण्यास सुरवात झाली. 

यांची होती उपस्थिती 
माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, दिलीप संकलेचा, विजय जगताप, जगन्नाथ गोंदकर, गनीभाई पठाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com