पेडगावातील शंभूराजांच्या शौर्यस्तंभाला प्रशासनाने अशी दिली मानवंदना

संजय आ. काटे
Wednesday, 19 February 2020

श्रीगोंदे : छत्रपती संभाजी राजांना बंदी करुन पेडगावच्या गडावर अघोरी यातना दिल्या. आज  ई सकाळने वृत्तातून शंभुराजांच्या धीरोदात्तपणाबद्दलची कहाणी उजेडात आणली. खरे तर हे स्मृतीस्थळ आहे. अनेक शंभूप्रेमी इथे नतमस्तक होतात. मात्र, शासन आणि प्रशासनाकडून या प्रेरणास्थळाची आतापर्यंत अवहेलनाच झाली आहे. ई सकाळच्या वृत्ताची दखल घेत तहसीलदार महेंद्र माळी यांनी तेथे जात शिवजयंती साजरी  केली. शंभुराजांच्या त्या शौर्य स्तंभाला अष्टकोनी चौथरा बांधण्यासाठी पुढाकार घेणार असून पुरातत्व विभागाकडून त्यासाठी मंजूरी घेवू अशी ग्वाही देत कामही सुरू केले.

शंभुराजांना बंदी केल्यानंतर पेडगावच्या बहादूरगडावर (आजचा धर्मवीरगड) आणले होते. तेथे त्यांच्यावर औरंगाजेबाने यातना दिल्या. मात्र हा राजा डगमगला नाहीच शिवाय औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून साखळदंडात कैद असतानाही लढला. शंभुराजांच्या धिरोदात्तपणाचा साक्षीदार असणारा हा धर्मवीर गड विकासात्मकदृष्टीने मात्र अडगळीत आहे. आज ई सकाळने वृत्तातून तेथील छायाचित्रण दाखवित वास्तव मांडले.
गडाचे संवर्धन करणाचे शिवदुर्ग संवर्धन समिती, शिवदुर्ग ट्रॅक्टर्स फाऊंडेशन, पेडगाव ग्रामपंचायतीने शिवजंयती उत्सव आयोजित केला होता.

यावेळी संभाजीराजेंच्या शौर्यस्तंभाजी विधीवत पूजा करुन तेथे माळी यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर बोलताना माळी म्हणाले, आज सकाळ ऑनलाईन वृत्तातून शंभुराजांचा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा समोर आला. येथील गडाचा विकास करण्यासाठी आता प्रशासन पुढाकार घेणार आहे. शौर्यस्तंभाला अष्टकोनी चौथरा उभारणीच काम हाती घेणार असून पुरातत्व विभागाकडून त्यासाठी मंजूरी घेवू. भीमानदी काठी असणारा हा गड भविष्यात जलपर्यटन स्थळ म्हणून विकसीत होवू शकते. हा शौर्याचा इतिहास जनत केला जाईल.

यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्यासह दिगंबर भुजबळ, संदीप खलाटे. कपिलेश्वर उल्हारे, संजय वेठेकर, संकेत नलगे, सोमेश शिंदे, सुजाता दळवी उपस्थितीत होते.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे, दिगंबर भुजबळ, संदीप खलाटे, कपिलेश्वर उल्हारे, संजय वेठेकर, संकेत नलगे, सोमेश शिंदे, सुजाता दळवी आदी उपस्थित होते. अवघ्या वीस मिनिटात साकारली रांगोळीत राजांची प्रतिकृती
येथील कन्या विद्यालयातील कला शिक्षक सुनील शिंदे यांनी साकारली.

तहसीलदारांकडून सकाळचे अभिनंदन
तहसीलदार माळी यांनी आज पेडगावच्या धर्मवीरगडावर सकाळ माध्यम समुहाचे कौतुक व अभिनंदन केले. शंभुराजेंनी यातना भोगल्या. मात्र, स्वराज्यासाठी कुठलीही तडजोड केली नाही. याची साक्ष देणाऱ्या या धर्मवीर गड व तेथील विकासाच्या बाबी समोर आणल्याने प्रशासन म्हणून आम्ही लगेच कामाला सुरुवात करीत आहोत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti on the fort of Pedgaon