Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उपचाराची गरज; असं का म्हणाले संजय राऊत?

भाजपला शिवसेनेचा धनुष्यबाण संपवून टाकायचा आहे. त्यासाठी त्यांनी कूटनीती आखली आहे.
Sanjay Raut vs Devendra Fadnavis
Sanjay Raut vs Devendra Fadnavisesakal
Summary

'ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेना रुजवली. 40-50 वर्षे आमचे लोक धनुष्यबाणावर लढले. त्या धनुष्यबाणाला महाराष्ट्रातून संपवण्याचा डाव भाजपने आखलाय.'

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर उपचारांची गरज आहे. त्यांच्यावर आम्ही ठाणे किंवा मुंबईत उपचार करू, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी येथे पत्रकार परिषदेत केली.

भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वसुली खोरांचे रॅकेट भाजपमध्ये घेतलेले आहे. इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून या रॅकेटकडून वसुलीचे काम आता सुरू झाले आहे. आम्हाला हे रॅकेट आमच्या पक्षात चालवले जात होते याची माहिती उशिरा कळाली, पण आता हे लोक भाजपमध्ये गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut vs Devendra Fadnavis
Sangli Lok Sabha : ..तर भाजप उमेदवार संजय पाटलांचा सांगलीत पराभव होईल; माजी राज्यमंत्र्यांचं सूचक विधान

फडणीसांना या रॅकेट बद्दल माहिती नसेल तर त्यांनी किरीट सोमया यांना विचारून अधिक माहिती घ्यावी, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. भाजपला शिवसेनेचा धनुष्यबाण संपवून टाकायचा आहे. त्यासाठी त्यांनी कूटनीती आखली आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेना रुजवली. 40-50 वर्षे आमचे लोक धनुष्यबाणावर लढले. त्या धनुष्यबाणाला महाराष्ट्रातून संपवण्याचा डाव भाजपने आखला आहे.

Sanjay Raut vs Devendra Fadnavis
Vishal Patil Sangli : सांगली काँग्रेसचीचं! संजय राऊत सांगलीत असताना विशाल पाटलांनी थोपटले दंड

या स्थितीत शिवसेना आणि धनुष्यबाण चोरणारे मिंदे शेपूट घालून बसले आहेत, असा जोरदार हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना उमेदवारी देण्यात शिंदे कमी पडले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे मतदारसंघ आम्ही जिंकत आहोत, असा विश्वास देखील राऊतांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com