शिवसेना खासदार संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात पण....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

संजय राऊत यांचे विमानाने सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

बेळगाव - सार्वजनिक वाचनालयाच्या नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला बेळगावात दाखल झालेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना नियोजित तळापासून अज्ञातस्थळी हलविण्यात आले असून योग्य वेळी त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.

अज्ञातस्थळी हलवले

दुपारी दोन वाजता संजय राऊत यांचे विमानाने सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काही पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारल्यानंतर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेले. त्यामुळे सीमाभागात पुन्हा चर्चेला उधाण आले असून वातावरण तणावग्रस्त बनले आहे. याबाबत पोलिसांना विचारले असता संजय राऊत यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आम्ही त्यांना अज्ञात स्थळी हलवले असून संध्याकाळी कार्यक्रमाच्या स्थळी त्यांना घेऊन जाण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP Sanjay Raut in karnatka police custody