बेळगावात उद्या शिवजयंती चित्ररथ मिरवणूक, मराठमोळ्या संस्कृतीचे घडणार दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiva Jayanti Chitrarath procession Belgaum

बेळगावात उद्या शिवजयंती चित्ररथ मिरवणूक, मराठमोळ्या संस्कृतीचे घडणार दर्शन

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक भव्य प्रमाणात काढण्याची तयारी शिव जयंती उत्सव मंडळांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर बुधवारी बेळगाव शहरात पुन्हा एकदा चित्ररथ मिरवणुकीचा जल्लोष पहावयास मिळणार आहे. सोमवारपासून शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली असून मंगळवारी वडगाव आणि अनगोळ भागात भव्य प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. तर शहरात बुधवारी (ता. ४) रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे काढल्या जाणाऱ्या पालखीचे पूजन सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौक येथे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्षदीपक दळवी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून अतिरिक्त पोलीस फौजफाटा ठीक ठिकाणी तैनात राहणार आहे. मिरवणुकीच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून मिरवणूक मार्गावरील सर्व अडथळे हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळानी वेळेत मिरवणुकीत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

मिरवणूकीचा मार्ग पुढील प्रमाणे

नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजन झाल्यानंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गे टिळक चौक पर्यंत मिरवणूक निघणार आहे. तसेच यावेळी मिरवणुकीत सलगता रहावी यासाठी पोलसांकडून देखावे सादर करण्यासाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे.

शहापूरचा मार्ग पुढील प्रमाणे

नाथ पै सर्कल शहापूर येथे ७ वाजता पुजण करुन शहापूर भागातील मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाण पुल, स्टेशन रोड, सेंट मेरीज, उभा मारूती मार्गे नागरिक संभाजी चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभाग

शिवजयंती उत्सवाला मोठी परंपरा आहे. त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीच्या माध्यमातून शिवाजी राजांचा इतिहास सादर करावा मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पाडावी यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही अडचण आल्यास मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

-दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

Web Title: Shiva Jayanti Chitrarath Procession Belgaum Darshan Marathmola Culture Take Place

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top