रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून जो सध्या वाद सुरू आहे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भिडे यांनी, ‘‘वादाबाबत स्वतंत्रपणे बोलेन. मात्र छत्रपती संभाजीराजे जे बोलले ते चुकीचेच आहे,’’ अशी टिप्पणी केली.
सांगली : ‘‘छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) बलिदानानिमित्त गेले महिनाभर सुरू असलेल्या बलिदान मासची सांगता मूक पदयात्रेने होणार आहे. शनिवारी (ता. २९) सकाळी ७.३० वाजता मारुती चौकातून मूक पदयात्रा निघणार आहे,’’ अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhajirao Bhide) यांनी दिली.