esakal | बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळा विक्रीला कानडी कार्यकर्त्यांकडून आडकाठी
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji maharaj stachu not sale in belgaum kannada people oppose in belgaum

प्रशासनाच्या आडुन मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अतीच होत असल्याचे मत व्यक्‍त होत आहे.

बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळा विक्रीला कानडी कार्यकर्त्यांकडून आडकाठी

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखान करणाऱ्या कानडी संघटनाच्या काही कार्यकर्त्यांनी आता शिवाजी महाराजांचे लहान आकारातील पुतळे विकणाऱ्या विक्रेत्यांवर दादागिरी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आडुन मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अतीच होत असल्याचे मत व्यक्‍त होत असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना वेळीच आवरण्याची गरज निर्माण झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर माध्यमांतुन राजांबाबत नको त्या प्रकारचे मजकुर लिहण्यात कन्नड संघटनाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आक्षेपार्ह लिखान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन बघ्याची भुमिका घेत असतानाच काहीजण आता रस्ताच्या कडेला बसुन शिवाजी राजांचे लहान लहान पुतळे विकणाऱ्या विक्रेत्यांना त्रास देऊ लागले आहेत. 

हेही वाचा - हृदयद्रावक! एक वर्षाचं बाळ बिबट्याने तोंडात धरून नेलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं -

रविवारी नाथ पै चौक येथे रस्ताच्या कडेला बसुन विक्रेते शिवाजी राजांचे पुतळे विकत होते. तसेच त्यांच्याकडे खरेदीसाठी विचारणाही होत होती. त्याचवेळी पाच युवक त्या ठिकाणी आले व त्यांनी शिवाजी राजांचे पुतळे विकायचे नाही अन्यथा त्रास दिला जाईल असे सांगत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विक्रेत्यांनी अनेक वर्षांपासून पुतळे विकत आहे. मग आताच का दादागिरी करताय ? असे विचारले मात्र काहीही झालेले पुतळे विकायचे नाहीत असे सांगत कानडी गुंडाची दादागिरी सुरुच होती. याची माहिती मिळताच काही जणांनी विक्रेत्याला न घाबरता पुतळे विक्री सुरु ठेवा काही झाले तर आम्हाला सांगा असे सांगत त्या विक्रेत्यांना धिर दिला. शिवाजी राजांचा इतिहास माहिती नसलेले काहीजण राजांबाबत आक्षेपार्ह लिखान करण्याबरोबरच आता पुतळ्यांची विक्री करण्यास मज्जाव केला जात आहे. याबाबत मराठी भाषिकांमधुन तिव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. 

कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या विक्रेत्यांनी राजांच्या मुर्ती विकतो म्हणुन तर आमचे पोट भरते असे सांगितले तरीही शिवाजी राजे कर्नाटकाचे नाहीत ते महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे येथे राजांच्या मुर्ती विकायच्या नाहीत असे सांगत आपला कंठु शमवुन घेतला. 

"शहाजी राजे कर्नाटकात आले नसते तर इथली परिस्थिती वेगळी असती याची माहिती कन्नड संघटनाच्या कार्यकर्त्यांनी घेणे आवश्‍यक आहे. शिवाजी राजांचा अगोदर इतिहास समजुन घेतला पाहिजे. राजे हे फक्‍त मराठा समाजाचे नसून समस्त हिंदुचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे विनाकारण राजांचे पुतळे विक्री करणाऱ्यांना त्रास देऊ नये."
 

- अजीत जाधव, शहराध्यक्ष शिवप्रतिष्ठान

हेही वाचा - कर्नाटकात प्रवेश बंद ! 72 तासाच्या आतील  कोविड निगेटिव्ह रिपोर्टची मागणी; सीमेवरून वाहने परत

संपादन - स्नेहल कदम