
वैद्यकीय उपचारानंतर शिवेंद्रसिंहराजेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले, चुलत बंधू विक्रमसिंहराजे भोसले उपस्तिथ होते.
सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मंगळवारी (ता. १८) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सातारा आणि जावळी तालुक्यात पसरताच एक एक कार्यकर्ते रुग्णालय परिसरात जमू लागले. वैद्यकीय उपचारानंतर शिवेंद्रसिंहराजेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले, चुलत बंधू विक्रमसिंहराजे भोसले उपस्तिथ होते.
खरंतर, राजकारणी मंडळी म्हटलं की दिवसभर कामाचा व्याप आणि ठिकठिकाणी दौरे असतात. वारंवार सभा आणि कार्यक्रमासाठी फिरत राहावं लागतं. अशात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अनेकदा भर सभेत राजकारण्यांना कामाच्या व्यापामुळे त्रास झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे कामाच्या तणावात आरोग्याची काळजी घेणं फार शक्य होत नाही.
दरम्यान आज (बुधवार) सकाळच्या प्रहरी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची पुन्हा वैदयकीय अधिकारी यांनी तपासणी केली. यामध्ये फारशी चिंता करण्यासारखे काही नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचारासाठी तसेच विविध वैद्यकीय तपासणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे मुंबईला रवाना झाला. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंची तब्येत ठीक आहे, अधिक तपासणीसाठी मुंबईला नेले आहे. तरी नागरीकांनी काळजी करु नये असे आवाहन त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.