इचलकरंजी - जपानमध्ये यंदा शिवजयंतीच्या भव्य तयारीने जोर धरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी जपानमधील भारत कल्चरल सोसायटीने एक अनोखी संकल्पना साकारली आहे. प्रतापगडावर विधिवत पूजन केलेली शिवज्योत यंदा थेट जपानच्या भूमीत पोहोचणार आहे.