Vidahan Sabha 2019 : शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांने दिला स्वबळाचा नारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील युतीतून येणारी एकही जागा सोडणार नाही अशी डरकाळी फोडली आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघ आहेत त्यापैकी सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर व अक्कलकोट हे तीनच मतदारसंघ भाजपाकडे युतीधर्मानुसार आहेत, उर्वरित मतदारसंघ ही शिवसेना लढवते.

सोलापूर : सध्या भाजप-सेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे अन् युती होणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे. प्रत्येक मतदारसंघात सेना भाजप आपापली ताकद वाढवताना दिसत आहे. 

त्यातच सेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील युतीतून येणारी एकही जागा सोडणार नाही अशी डरकाळी फोडली आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघ आहेत त्यापैकी सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर व अक्कलकोट हे तीनच मतदारसंघ भाजपाकडे युतीधर्मानुसार आहेत, उर्वरित मतदारसंघ ही शिवसेना लढवते.

नुकतीच भाजपचे मंत्री राम शिंदेंनी भाजप इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि भाजपाला यंदा 3 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटलं आहे. आता तानाजी सावंतांनी युतीचे आडाखे बांधू नका, प्रत्येक मतदारसंघात कामाला लागा म्हणून युती न होण्याच्या शक्यतांना दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena BJP may Contest separately in assambly election says tanaji sawant