अध्यक्षांवर कन्नड गुंडांचा भ्याड हल्ला; शिवसेना आक्रमक

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर त्यांची अडवणूक करण्यात आली.
अध्यक्षांवर कन्नड गुंडांचा भ्याड हल्ला; शिवसेना आक्रमक
Updated on
Summary

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर त्यांची अडवणूक करण्यात आली.

कोगनोळी : बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित महामेळाव्यास महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांची गाडी सोमवारी (ता. १३) कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोगनोळी येथील टोलनाक्यावर रोखण्यात आली. त्यांना कर्नाटकात जाण्यास मज्जाव करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे कारण देत देवणे यांना महामेळाव्यास जाण्याच्या मार्गात आडकाठी आणण्यात आली.

महाराष्ट्रातून बेळगाव येथील महामेळाव्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळी जाणार असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलिस प्रशासनाच्या वतीने सोमवारी (ता. १३) येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दूधगंगा नदीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे व अन्य सहकारी बेळगाव येत असताना कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर त्यांची अडवणूक करण्यात आली.

अध्यक्षांवर कन्नड गुंडांचा भ्याड हल्ला; शिवसेना आक्रमक
बेळगावात समितीच्या अध्यक्षांवर भ्याड हल्ला; मराठी भाषिक संतप्त

यावेळी विजय देवणे म्हणाले, आपल्याला का अडवण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, या उद्देशाने आपल्याला कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे सांगितले.

विजय देवणे म्हणाले, बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्यात आपल्याला निमंत्रण देण्यात आले आहे. या महामेळाव्यास आपण जात असताना कोगनोळी येथील सीमा तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. कर्नाटक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सीमाभागातील नागरिकांची हेळसांड होत आहे. या मेळाव्यास निमंत्रण असूनही कर्नाटकात प्रवेश बंदी करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत बेळगावला जाणार असल्याचा निर्धार केला होता. पण आपणावर प्रशासन व पोलिसांकडून अन्याय झाला आहे.

अध्यक्षांवर कन्नड गुंडांचा भ्याड हल्ला; शिवसेना आक्रमक
अध्यक्षांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध; बेळगावसह परिसर बंद

यावेळी निपाणी मंडळ पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर, कोगनोळी पोलिस उपठाण्याच एएसआय एस. ए. टोलगी, पोलिस राजू गोरखनावर यांच्यासह अन्य पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jat Police Inspector sp action
Why has monsoon slowed in Sangli?
How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com