esakal | सोलापूर झेडपीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा अध्यक्ष (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

-

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आघाडीने अध्यक्षपद पदरी पाडण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल अशी शक्‍यता वर्तवली जात होती.

सोलापूर झेडपीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा अध्यक्ष (Video)

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा अध्यक्ष झाला आहे. अध्यक्षपदी निवड झालेले अनिरुद्ध कांबळे हे करमाळा तालुक्‍यातील केम जिल्हा परिषदेच्या गटातून विजयी झालेले सदस्य आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. 
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आघाडीने अध्यक्षपद पदरी पाडण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल अशी शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र, महाविकास आघाडीची खेळी सोलापुरात अयशस्वी झाली आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीत अनिरुद्ध कांबळे यांना 37 तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्रिभुवन धाईंजे यांना 29 मते पडली आहेत. 

सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगाबाद येथे महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचीही अध्यक्ष करण्यासाठी बैठका झाल्या मात्र, त्यांना त्यात अपयश आले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मी राष्ट्रवादीचाच असल्याचे वकत्यव्य केले होते. त्यामुळे जिल्हात उलटसुलट चार्चां रंगल्या होत्या. अखेर भाजपने यशस्वी खेळी खेळीत महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार यांचा पराभव करुन शिवसेनेचे कांबळे यांना अध्यक्ष केले. करमाळा तालुक्‍यात नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून सविताराजे भोसले कोर्टी, लक्ष्मी आवटे वीट, अनिरुद्ध कांबळे केम व निलकंठ देशमुख हे वांगी गटात विजयी झाले होते. सविताराजे भोसले या शिवसेनेच्या गटप्रमुख होते. जिल्ह्यात शिवसेनेचे पाच सदस्य निवडूण आले होते. त्यात करमाळ्याचे चार सदस्य आहेत. जिल्ह्या परिषदेत प्रथमच शिवेसेनेच पाच सदस्य निवडून आले होते. कांबळे यांना अध्यक्ष करण्यासाठी भाजपसह इतर समविचारी गटानेही पाठिंबा दिला. अध्यक्षाची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केले. यावेळी जिल्हा परिषदेत आमदार प्रशांत परिचारक, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शहाजी पवार यासह इतर प्रमुख उपस्थित होते. कांबळे यांच्या निवडीने करमाळ्याल्या 15 वर्षानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी नारायण खंडागळे हे करमाळा तालुक्‍यातील अध्यक्ष होते.