धक्कादायक ! सांगली बाजार समितीचे माजी सचिव प्रकाश पाटील यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव प्रकाश पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

सांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव प्रकाश पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्या निधनाने सहकारी क्षेत्रासह व्यापार क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ते निवृत्त झाल्यानंतर वकील म्हणून कार्यरत झाले होते. 

माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांचे विश्‍वासू म्हणून प्रकाश पाटील यांची ओळख होती. बाजार समितीचे सचिव म्हणून त्यांनी प्रभावी काम केले. अनेक खटल्यांत ते उच्च न्यायालयपर्यंत गेले. त्या काळात त्यांचा कायद्याचा अभ्यास इतका झाला की त्यांनी त्याची परीक्षा दिली आणि निवृत्तीनंतर वकिली सुरु होती. त्यातही त्यांनी जम बसवला होता. कोरोना संकट काळातही त्यांची सतत धावपळ सुरु होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा धक्कादायक मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking! Former Secretary of Sangli Bazar Samiti Prakash Patil passed away