
विटा : हिंगणगादे (ता. खानापूर) येथील तलावात बुडून घानवडच्या दोन तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी पावणेचारच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. निशा दिगंबर आढगळे (वय २०) व मयूरी हणमंत आढगळे (वय १७, दोघी, मूळ, चिंचणी, जि. सातारा, सध्या घानवड, ता. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. दुर्गा मोहिते यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.