policesakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Police : पोलिसच ‘चोरावर मोर’! पैसे परत घ्यायला गेलेल्यालाच लुबाडले
शिवार विकून त्याच्याकडे दहा-बारा लाख रुपये आले होते. त्याला मोटार घ्यायची होती. कुणीतरी पाहुणा भेटला अन् चोरीचं सोनं घेऊन फायद्यात येऊ, असं आमिष त्यानं दाखवलं.
सांगली - शिवार विकून त्याच्याकडे दहा-बारा लाख रुपये आले होते. त्याला मोटार घ्यायची होती. कुणीतरी पाहुणा भेटला अन् चोरीचं सोनं घेऊन फायद्यात येऊ, असं आमिष त्यानं दाखवलं. पूर्व भागातील एका गावात दोघं पैसे घेऊन गेले. सोनं घेऊन एकजण येणार होते, घडलं भलतंच. तिथे दहा-बारा जणांची टोळी आली आणि त्यांनी या दोघांना बेदम मारहाण करून पैसे घेऊन पळ काढला. गोष्ट इथं संपत नाही, इथे ती सुरू होते.