
Miraj Crime : मिरज शहरातील मंगळवार पेठेतील एका प्रसिद्ध प्रार्थनास्थळासमोर पूर्ववैमनस्य व पोलिसांनी टिप दिल्याच्या संशयातून दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी एका संशयिताने गावठी पिस्तुलातून गोळीबार करत सलून दुकानाची नासधूस केली. यामुळे शहरात खळबळ उडाली असून, मिरज शहर हादरले आहे. घटनेनंतर परिसरातील दुकाने बंद केली. घटनेची शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, चौघा संशयितांवर गुन्हा नोंद केला. ते संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.