कोंबडीविना कशी होणार आकाडी... वाचा काय झाले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

आषाढी महिना संपण्यासाठी अवघे सहा ते सात दिवसांचा कालावधी उरल्याने ग्रामीण भागात आकाडी साजरी करण्याची धांदल उडाली आहे.

पेड (जि . सांगली) : आषाढी महिना संपण्यासाठी अवघे सहा ते सात दिवसांचा कालावधी उरल्याने ग्रामीण भागात आकाडी साजरी करण्याची धांदल उडाली आहे. आकाडी साजरी करण्यासाठी देशी कोंबड्यांची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे कोंबड्या मिळविताना लोकांची दमछाक झाली आहे. ग्रामीण भागात 400 रुपये किंमत असलेल्या कोंबड्यांची 500 ते 600 रुपयांची विक्री केली जात आहे. 

पूर्वजांपासून चालत आलेला आषाढ महिना हा मरिमी, लक्ष्मी, ताई-आई, म्हसोबा, घरातील देवाच्या नावाने मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार असे आठवड्यातून चार दिवस अशा रीतीने महिनाभर धूमशान सुरू आहे.

त्यातच आषाढ महिना संपण्यासाठी अवघे सहा ते सात दिवस उरले असल्याने आणि आषाढाची सांगता मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी कोंबड्या, मेंढी, बोकडाची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे. 

त्यातच चिकन, मटणाचे दर हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. मटणाचे दर 560 ते 580 रुपये, चिकन 200 ते 240 रुपये, तर मासे हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. आठवड्यातील चार दिवस या यात्रा सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. गटारी अमावस्येदिवशी आकाडी चाललेल्या कार्यक्रमाची सांगता केली जाते. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage of local hens for party of Aakadi

Tags
टॉपिकस
Topic Tags: