esakal | सांगलीच्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांना कारणे दाखवा

बोलून बातमी शोधा

Show reasons to the seven splitted BJP corporator of Sangli}

सांगली महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांचा अखेर कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या.

सांगलीच्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांना कारणे दाखवा
sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ः महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांचा अखेर कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. आज त्या रजिस्टर पत्राद्वारे त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठवण्यात आल्याचे गटनेते विनायक सिंहासने यांनी सांगितले. पुढील सात दिवसांत त्यांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. 

बहुमत असतानाही सत्ताधारी भाजपला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपची सात मते फुटल्याने धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांना पराभव पत्कारावा लागला. सातपैकी आनंदा देवमाने व शिवाजी दुर्वे हे दोघे मतदानास गैर हजर राहिले; तर स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम व विजय घाडगे या पाच जणांनी थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजपची सत्ता गेली. 

दोन्ही कॉंग्रेसने घोडेबाजार करत आमचे नगरसेवक फोडले व सत्ता मिळवली, असा आरोप भाजपने केला आहे. तसेच फुटीर सात सदस्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवणार असल्याचा इशाराही पक्षाने दिला होता. त्यानुसार आता ही कारवाई सुरू झाली आहे. या फुटीरांना कायदेशीर हिसका दाखवण्यासाठी पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करण्यात येणार आहे.

अपात्रतेच्या नोटिशीवर त्यांनी खुलासा केल्यानंतर पुढील कारवाई सुरू होणार आहे. शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर व महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या स्वाक्षरीने या नोटिशी बजावल्या आहेत. 

संपादन : युवराज यादव