श्रावण संपल्यावर बसरल्या श्रावण सरी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

खंड महिनाभर हा "श्रावण' आहे, असा फिलच नव्हता. एवढा पाऊस पडत होता. श्रावण सरी म्हणजे काय असतात, हे दाखवायलाही दिसत नव्हते. काल श्रावण संपला, आज भाद्रपद लागला आणि मग दुपारी श्रावण सरी बरसल्या.

सांगली ः अखंड महिनाभर हा "श्रावण' आहे, असा फिलच नव्हता. एवढा पाऊस पडत होता. श्रावण सरी म्हणजे काय असतात, हे दाखवायलाही दिसत नव्हते. काल श्रावण संपला, आज भाद्रपद लागला आणि मग दुपारी श्रावण सरी बरसल्या. उन्ह आणि पाऊस एकाचवेळी पाहण्याचा आनंद लोकांना लुटता आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सांगलीसह परिसरात श्रावणसरी सारखा पाऊस बसरला. 

ऋतुचक्र बदलले आहे, असे सगळेच सांगत आहेत. ते इतके बदलले आहे की श्रावणात अल्हाददायक वाटावा, असा पाऊसच पडला नाही. दे दणादण पावसाने हजेरी लावली. उन्ह पावसाचा खेळ म्हणजे तर श्रावणाची खासियत. पण, यंदा तसे चित्र पहायला मिळालेच नाही. उन्हात पाऊस तर लांबची गोष्ट. आज मात्र ते चित्र पहायला मिळाले. उन्हात पाऊस पडत होता. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे सूर्यकिरणांना भेदून वरुणराजाने हजेरी लावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shravan showers at the end of Shravan

Tags
टॉपिकस
Topic Tags: