आटपाडी : आटपाडीचे सौरभ पाटील आणि प्रणिती भालके हे दोघेही सख्खे भाऊ-बहीण आटपाडी आणि पंढरपूर येथे नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात एकाचवेळी उतरले आहेत. .दोघांनी आपली उमेदवारी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून दाखल केली आहे. दोघांच्याही लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत रामभाऊ पाटील यांनी पाच वर्षे आटपाडीचे सरपंच आणि पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले होते..Sangli Politics : एकाच घरातील उमेदवार भिडले! नात्यांच्या या राजकीय लढतीने आटपाडीकरांचे लक्ष वेधले!.त्यांची पुतणी प्रणिती हिचा पंढरपूरचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ यांच्याशी विवाह झाला आहे. सध्या त्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. तिथे त्यांनी भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. स्वतः प्रचारात आघाडीवर राहून जनमानसात मिसळल्या आहेत..भाषणावर चांगले प्रभुत्व मिळवले आहे. समाज माध्यमांवर त्यांचा प्रचार आणि सभा यांनी धुमाकूळ घातला आहे. इकडे, आटपाडीत त्यांचे सख्खे लहान भाऊ सौरभ पाटील सुद्धा नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात उतरले आहेत..Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली.त्यांनी कुणबीमधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्याच्या प्रचाराचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी केले आहे.. तर प्रचाराची धुरा भारत पाटील, आनंदराव पाटील, डी. एम. पाटील, हणमंतराव देशमुख यांनी सांभाळली आहे. कुणबीमधून उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्या उमेदवारीचा विरोधकांनी चांगलाच धसका घेतला आहे. सौरभ आणि प्रणिती बहीण-भावाच्या लढतीकडे आटपाडीसह पंढरपूरकरांच्या नजरा लागल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.