सांगलीत लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी 50 हजार ग्राहकांच्या सह्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

सांगली, ः राज्यातील सामान्य नागरिक अडचणीत असताना दिल्ली सारख्या छोट्या राज्यात 300 यूनिट पर्यंत वीज वापरास जनतेला वीज बील माफ केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील सामान्य जनतेलाही 300 युनिटपर्यंतची माफी द्यावी, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने आजपासून ग्राहकांच्या सद्यांच्या मोहिम सुरु केली.

सांगली, ः राज्यातील सामान्य नागरिक अडचणीत असताना दिल्ली सारख्या छोट्या राज्यात 300 यूनिट पर्यंत वीज वापरास जनतेला वीज बील माफ केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील सामान्य जनतेलाही 300 युनिटपर्यंतची माफी द्यावी, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने आजपासून ग्राहकांच्या सद्यांच्या मोहिम सुरु केली.

पहिल्याच दिवसी 10 हजारहून अधिक ग्राहकांनी फॉर्मवर सह्या केल्या आहेत. महापालिका हद्दीतील 50 हजारहून अधिक ग्राहकांच्या सहीचे निवेदन राज्य सरकारला देण्यात येणार असल्याचे समितीने आज सांगितले. 

याबाबत आज सांगलीतून स्वाक्षरी मोहीम घेऊन आंदोलनाला सुरुवात झाली. निवेदन मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवले जाणार आहेत. बीलमाफी, योग्य बील दुरुस्ती केल्या शिवाय वसूली करू नये असे आव्हानही समितीने केले आहे. कोरोना संकटात सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना शासनाने त्याना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सर्वत्र दिसूत आहे. लॉकडाऊन नियोजन करत होते त्यावेळीच सामान्य जनतेच्या कामधंदा, रोजगार, व्यापार सगळ्या आर्थिक उत्पन्नच्या स्त्रोताना आळा बसणार असताना सर्वात महत्वाचा भाग असणाऱ्या विजबीला बाबत प्रशासनाने प्रचंड गोंधळ माजवला आहे. यासंकट काळात शासनाने वीज दर वाढवत जनतेची लूट केली.

महावितरण सरासरी बिलाच्या नावावर जनतेला अवाजवी बिल वाटप करुण सदर बीले सक्तीने वसूल करत आहे. यापूर्वीच वीजबीलाची होळी करुन बील दुरुस्ती,समान हप्ते, बिनव्याजी घेण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्या नागरिकांनी यासंकट काळात वीज वितरण विभागास बील भरून सहकार्य केले आहे त्याना देखील शासनाने प्रोत्साहनपर अनुदान दिले पाहिजे अशी मागणी केली आहे. 

यावेळी पृथ्वीराज पवार, माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, महेश खराडे, विकास मगदूम, प्रशांत भोसले, राहूल पाटील, उमेश देशमुख, आसिफ बावा, ज्योती आदाटे, संजय पाटील, संभाजी पोळ, लालू मिस्त्री, रामभाव पाटील, रेखा पाटील, उपस्थित होते. 
............... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signatures of 50,000 customers for electricity bill waiver during Sangli lockdown period