
मोहोळ : मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाचे प्रांगण. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, क्षणा, क्षणाला लागलेली उत्कंठा, टाळ्या प्रचंड अन् हलग्यांच्या कडाकडाटात तुतारी निनादली. अशा उन्मेषलेल्या वातावरणात. गजबजलेल्या श्री नागनाथ केसरी कुस्ती समितीच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती मोहोळ येथील. महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व भारत केसरी हरियाणाचा पै. भोला पंजाबी यांच्यात झाली. ब्याकथ्रो डावावर सिकंदर शेख याने भोला पंजाबीला आसमान दाखविले. पहिले बक्षिस पटकाविले.