सीना-कोळगाव धरण अद्यापही कोरडेच, शेतकऱ्यांचा संताप 

water1
water1

सोलापूर : उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 200 हेक्‍टर लाभक्षेत्र असलेले सीना नदीवरील सुमारे सहा टीएमसीचे कोळगाव धरण अद्यापही कोरडे आहे. निमा पावसाळा झाला तरी अद्याप या धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. एकीकडे धरणे भरुन लाखो लिटर पाणी दुसऱ्या राज्यात जात आहे. तर दुसरीकडे त्याच्याच शेजारील धरणात सरकारच्या नियोजन शुन्य कारभारामुळे पाण्याचा थेंबही नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीवर अहमदनगर जिल्ह्यात निमगाव गांगर्डी हे एक व सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणात कुकडी प्रकल्पातून ओव्होरफ्लोचे पाणी सीना नदीत सोडल्यास येऊ शकते. किंवा उजनी धरणातूनही कोळगाव धरणापर्यंत पाणी येऊ शकते. याबाबत वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करुन सुद्धा केवळ राजकारणाचा मुद्दा म्हणून याकडे पाहिल्याने पावसाळ्यात सुद्धा येथे टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

सीना नदीत कुकडीतून पाणी सोडले तर चोंडी येथून कोळगाव धरणासह सोलापूर जिल्ह्यातील संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथील बंधारे भरता येणार आहेत. याशिवाय मांगी तलावातून सुद्धा कोन्होळा नदीतून धरणात पाणी सोडता येऊ शकते. कुकडी व दहिगावच्या (उजनी धरणातून) योजनेतून ओव्हरफ्लो पाण्याने सिना कोळगाव धरण भरुन घ्यावे या मागणीसाठी करमाळ्यातील शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे शाहुराव फरतडे यांनी 2016 मध्ये मुंबईपर्यंत ऐतहासीक पायी दिंडी काढुन लक्ष वेधले होते. तेव्हा पाणी सोडण्याचे अश्‍वासन दिले होते. मात्र सध्या सरकारला त्याचा विसर पडला आहे. 
लाभक्षेत्र : उस्मानाबाद (परांडा) : 6800 हेक्‍टर 
सोलापूर (करमाळा) : 3400 हेक्‍टर- साठवण क्षमता : 5325 द.ल.घ.फू 
असे येऊ शकते पाणी, 
- उजनी धरणातून दहिगाव योजनेद्‌वारे गुळसडी कॅनॉलमधुन पांडे तसेच तेथून ओढ्यातुन पुर्ण दाबाने पाणी सोडल्यास थेट सिना कोळगाव धरणात, यामुळे म्हसेवाडी तलाव भरता येऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com