"सीना'वरील नवीन पूल निकृष्ट असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नगर : रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीना नदीवरील लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक व नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली. काम दर्जेदार करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली.

सीना नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाला दोन्ही बाजूंनी जोडरस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक अनिल शिंदे यांनी आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आज दुपारी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर आदींनी येथे पाहणी केली.

नगरसेवक अनिल शिंदे, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, दत्ता जाधव, गणेश कंदूर, अशोक साळुंके, दादासाहेब अकोलकर उपस्थित होते.

जोडरस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे, शेजारी असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता करून द्यावा, दोन वर्षांपासून पुलाजवळच असलेल्या विद्युत रोहित्राचे रखडलेले स्थलांतर तातडीने करण्यात यावे, पाण्याची पाइपलाइन पुलावरून घ्यावी, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "sina's new bridge alleged to be inferior