esakal | कोयना धरणाचे सहा दरवाजे आठ फुटाने उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

koyana.jpg

कोयना धरणाची जलपातळी पुन्हा एकदा वाढल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा ८ फुटावर उघडण्यात आले आहेत.

कोयना धरणाचे सहा दरवाजे आठ फुटाने उघडले

sakal_logo
By
विजय लाड

कोयना : गत महिन्यात ३ ऑगस्टपासून मुसळधार पावसासाठी प्रतिचेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोटक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने व कोयना धरणातून सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे पाटण, कराड, सांगली, कोल्हापूर याठिकाणी हाहाकार उडवला होता.

दरम्यान, हाहाकार उडवून गायब झालेला हा पाऊस बरोबर एका महिन्याने धरण पाणलोटक्षेत्रात पुन्हा सक्रिय होवून मुसळधार पडत आहे. यामुळे कोयना धरणाची जलपातळी पुन्हा एकदा वाढल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा ८ फुटावर उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात एका महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने कोयनाकाठ जलमय झाला आहे.

loading image
go to top