साताऱ्याजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 6 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

साताऱ्यातील बाह्यवळण मार्गावरील डी-मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर आज (गुरुवार) पहाटे साताऱ्याजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले, तर 20 हून अधिक जण जखमी आहेत.

साताऱ्यातील बाह्यवळण मार्गावरील डी-मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले. तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या बसमधील प्रवासी कर्नाटकमधील असल्याचे वृत्त आहे.

महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. यावेळी सातारा शहराजवळच्या खंडेवाडीजवळून जात असताना ट्रकचे टायर फुटले. ट्रकचालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. त्याचवेळी एक ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून भरधाव वेगाने येत होती. ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवल्यामुळे ट्रॅव्हल्स ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six dead in accident near Satara on Pune-Banglore highway