किर्लोस्करवाडीला सहा रेल्वेंना थांबा मंजूर

किर्लोस्करवाडीला सहा रेल्वेंना थांबा मंजूर

सांगली -  जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. तेथे जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांना थांबे मिळावेत, यासाठी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. त्या अनुषंगाने किर्लोस्करवाडी येथे ६ रेल्वेगाड्या आणि मिरज व सांगली येथे ३ रेल्वेगाड्यांना थांबण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार संजय  पाटील यांनी दिली.

किर्लोसकरवाडीत रेल्वे थांबा मिळालेल्या सहा गाड्या अशा -

१६२०९ /१६२१० अजमेर एक्सप्रेस, १६५०५/१६५०६ गांधीधाम एक्सप्रेस  (प्रयोगिग तत्वावर ६ महिने ), १६५३१/१६५३२ गरीब नवाज एक्सप्रेस, १६५०७/१६५०८ जोधपुर एक्सप्रेस, १२७७९/१२७८० गोवा एक्सप्रेस, १७३१७/१७३१८ एल. टी.टी. एक्सप्रेस.

सांगली आणि मिरज येथे ३ रेल्वेगाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. त्या गाड्या अशा - १६५३३/१६५३४ जोधपुर एक्सप्रेस,  २२६८५/२२६८६ क्रांती एक्सप्रेस, १६६२९/१६६३० मलाबार एक्सप्रेस.

जिल्ह्यातील मालवाहतूक देशभरात होण्यासाठी किर्लोस्करवाडी येथे मालवाहतूकीसाठी गुड्स कॅरिअरची मागणी केली होती. त्यासाठीही यावेळी मंजूरी देण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com