animals in jat.jpg
animals in jat.jpg

बापरे...जत पूर्व भागात सहा लाख जनावरांची तडफड..वाचा

Published on

संख (सांगली)- पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला खरीप व रब्बी हंगाम, दुष्काळी परिस्थितीमुळे जत पूर्व भागात वैरणीची टंचाई निर्माण झाली आहे. दरीबडची, संख, माडग्याळ, जाडरबोबलाद, सोन्याळ, जालिहाळ खुर्द परिसरात साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे. पशुपालकासमोर जनावरांची जोपासना कशी करायची? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. 


कायम दुष्काळग्रस्त तालुक्‍यामध्ये शेती व्यवसायाबरोबरच जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे.तालुक्‍यात गाई बैल 88 हजार 905 म्हैशी 61 हजार161 शेळ्या 1 लाख 30हजार 395 मेंढ्या 77 हजार 976 कोंबड्या 2 लाख 51 हजार 190 अशी एकूण 6 लाख 10 हजार 605 जनावरे आहेत. 


पूर्व भागातील दरीबडची, संख, माडग्याळ, सोन्याळ, उटगी, लकडेवाडी, जाडरबोबलद, सिध्दनाथ, तिल्याळ, आसंगी (जत), जालिहाळ खुर्द, लमाणतांडा (दरीबडची), गोंधळेवाडी, अंकलगी,गुड्डापूर या भागात पाऊस अत्यल्प झाला आहे. खरीप, रब्बी हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामातील पिके आली नाहीत. शेतकऱ्यांनी पुढे पाऊस पडेल या आशेवर खरीप व रब्बी हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. जनावरांना वैरण आली नाही. तसेच सहा गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. द्राक्ष व डाळिंब बागेला टॅंकरने पाणी घातले जात आहे.या भागात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तालुक्‍यात 2012 च्या पशुगणेनुसार 3 लाख 59 हजार 415 हजार लहान मोठे जनावरांची संख्या आहे.240 दिवसासाठी सरासरी लागणारा चारा 5 लाख 51 हजार 997 मेट्रीक टन चारा आवश्‍यक आहे. शासनाने चा-यासाठी शासनाने चारा डेपो,चा-यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतक-यांतून होत आहे. 

कर्नाटकातून वैरणीस बंदी 
कर्नाटकातील तिकोटा,बिजरगी,कनमडी, बाबानगर या परिसरामध्ये डोणची जमीन आहे. माफक दरामध्ये वैरण मिळत असल्यामुळे पशुपालक येथून वैरणीची खरेदी करतात.सीमेवरील सर्व रस्ते सील करण्यात आली आहेत. त्यामुळे कर्नाटकातून येणारी वैरण बंद झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com