जिल्ह्यातील लोकांसाठी सहा महिने पुरेसे धान्य 

godam.jpg
godam.jpg
Updated on

सांगली- केंद्र सरकारने "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिधा पत्रिकाधारकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. मिरज येथील "एफसीआय' च्या गोदामात जिल्ह्यातील लोकसंख्येला सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा असल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली. 

"कोरोना' च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब लोकांसाठी पाच किलो धान्य आणि एक किलो डाळ मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीसाठी अद्याप जिल्हा प्रशासनाकडे आदेश आलेला नसला तरी त्याची वाटपाची तयारी प्रशासनाने केली आहे.

राज्य शासनानेही राज्यातील लोकांना येत्या तीन महिन्यात पुरेल एवढा पुरेसा अन्नधान्य साठा असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात त्यांनी कोणाला किती धान्य देणार हे स्पष्ट केले नाही. केंद्र सरकारने मात्र पहिल्या टप्प्यात तीन महिन्याचे धान्य मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. प्राधान्य गटातील कुटुंबांना हेच धान्य गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो दराने देण्यात रुपये किलो दराने देण्यात येणार आहे. 


दरम्यान सरकारने धान्य वाटपाबाबत घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याबाबत आवश्‍यक तयारी सुरू केली आहे. धान्य गोदामात कामावर जाणाऱ्या हमालांची पोलिसांकडून अडवणूक होऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हमाल कामावर रूजू झाले आहेत. 


""जिल्ह्यातील लोकसंख्येला सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा मिरजेतील शासकीय गोदामात उपलब्ध आहे. शासनाचा आदेश आल्यानंतर तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाईल.'' 
-वसुंधरा बारवे (जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli DCC Bank recruitment latest update
Maharashtra pomegranate price latest update
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Marathi News Esakal
www.esakal.com