जिल्ह्यात सहा बळी, नवे 34 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

सांगली जिल्ह्यातील बळींची संख्या 41 वर पोचली आहे. जिल्ह्यात नव्याने 34 रुग्णांची नोंद झाल्याने अकराशेचा टप्पा पार झाला. महापालिका क्षेत्रात 19 रुग्ण आढळले. सांगली-कुपवाड शहरात 14, तर मिरजेतील पाच रुग्णांचा समावेश आहे. वाळवा तालुक्‍यात चार, विटा शहरात एक रुग्ण आढळला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 108 रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 23 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात सहा बळी, नवे 34 रुग्ण 
 
सांगली, ः जिल्ह्यात कोरोनामुळे आज सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार रुग्ण सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित दोघे चिक्कोडी आणि अथणी (बेळगाव) येथील आहेत. सांगली जिल्ह्यातील बळींची संख्या 41 वर पोचली आहे. जिल्ह्यात नव्याने 34 रुग्णांची नोंद झाल्याने अकराशेचा टप्पा पार झाला. महापालिका क्षेत्रात 19 रुग्ण आढळले. सांगली-कुपवाड शहरात 14, तर मिरजेतील पाच रुग्णांचा समावेश आहे. वाळवा तालुक्‍यात चार, विटा शहरात एक रुग्ण आढळला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 108 रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील 23 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतेच आहे. जुलैला सुरवात झाल्यापासून बाधितांची संख्या गतीने वाढते. रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात आज नव्याने 34 रुग्ण आढळले. सांगलीतील विजयनगरमधील 45 वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील 77 वर्षीय आणि बुरुड गल्लीतील 73 वर्षीय वृद्धेला लक्षणे असल्याने मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उपचार सुरू असताना आज तिघांचा मृत्यू झाला. मिरज येथील अष्टविनायकनगरमधील 70 वर्षीय वृद्धाही बाधित होती. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 41 झाली.

मिरजेतील कोविड रुग्णालयात चिक्कोडीतील 54 वर्षांचा पुरुष व अथणी येथील 75 वर्षीय बाधित वृद्धावर उपचार सुरू होते. या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात 19 रुग्ण आढळून आले. सांगली शहरातील नऊ, तर मिरजेतील दहा रुग्णांचा समावेश आहे. सांगलीतील वसंत कॉलनीत तीन, सावली बेघर, वॉन्लेस हॉस्पिटल परिसर, शिवाजीनगर, अस्वले गल्ली, मार्केड यार्डासमोरील किसान चौक, मिरजेतील सेवासदन हॉस्पिटल परिसर, गणेश तलाव, कच्ची हॉल परिसर आणि कमानवेस याठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले. 

वाळवा तालुक्‍यातील कामेरीत तीन व इस्लामपूर शहरात एक रुग्ण आढळून आला. कडेगावमध्ये दोन, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण व कवठेमहांकाळ, शिराळा, तासगाव तालुक्‍यातील तुरची व जरंडी येथे प्रत्येकी दोन; तर विटा शहरात एक रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

 
जिल्हा बॅंकेचा लिपिकही बाधित 

मिरज तालुक्‍यात दोन रुग्ण आढळून आले. समडोळी येथील एक जण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सांगलीच्या मुख्यालयात लिपिक आहे. ते गत आठवड्यापासून रजेवर आहेत. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती. तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे समडोळीसह जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयात खळबळ उडाली. तुंग येथील एकजण बाधित आढळला. 

पॉईटर... 
जिल्ह्यातील चित्र 
आजअखेरचे बाधित- 34 
उपचार सुरू असलेले- 628 
आजअखेर कोरोनामुक्त- 00 
आजअखेर मृत झालेले- 41 
बाधितांपैकी चिंताजनक- 23 
ग्रामीण भागातील रुग्ण- 636 
शहरी भागातील रुग्ण- 91 
महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 381 

तालुकानिहाय रुग्ण ः 

आटपाडी- 82, जत- 107, कडेगाव- 53, कवठेमहांकाळ- 31, खानापूर- 36, मिरज- 75, पलूस- 67, शिराळा- 159, तासगाव- 30, वाळवा- 87, महापालिका क्षेत्र- 381. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six victims, 34 new patients in the district